पिंपरी, रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब पानपाटील यांनी रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना गुलाब पानपाटील म्हणाले की, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास खरा करूनच दाखवणार आहे. माझ्या पक्ष प्रवेश करतेवेळी मुकुंद रणदिवे यांनी पुढाकार घेऊन माझा पक्ष प्रवेश घडवून आणला.
पक्षप्रवेशावेळी वेताळ नगर चिंचवड मधील सुमेध बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष दत्तासाहेब कांबळे, आझाद समाज पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष प्रकाश कांबळे व महिला वॉर्ड अध्यक्ष अंजलीताई गायकवाड, शेवंताताई कांबळे आदींनी देखील पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी भीमराव सुरवसे, माजी अध्यक्ष राजु गायकवाड, रमेश कांबळे रिपब्लिकन सेनेच्या प्रदेश सदस्य रेशमाताई शेख, खेड तालुक्याचे महिला अध्यक्ष आशा ताई कुटे, व सुनिताताई कांबळे आदी उपस्थित होते.