पिंपरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने बेरोजगारांसाठी भव्य “नोकरी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव रविवार, दि. २० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत संत तुकाराम नगर, पिंपरी येथील भारतीय जैन संघटना स्कूल येथे पार पडणार आहे.
या नोकरी महोत्सवात फार्मा, एफएमसीजी, बँकिंग, आयटी, रिअल इस्टेट, इन्शुरन्स, ॲग्रीटेक, हेल्थकेअर आदी क्षेत्रांतील ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील.
या उपक्रमाबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले की, “शहरातील तरुण तरुणींना स्वयंसिद्ध करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे रोजगार मेळावे म्हणजे युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. पाचवी पासपासून पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्रीधारक सर्व उमेदवारांनी ncp.jobfairindia.in या संकेतस्थळावर तसेच जाहिरातीत दिलेल्या QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी.”
या रोजगार महोत्सवासाठी ९६५७५८०६२० / ९५७९६८३२६८ या क्रमांकांवर अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल.