पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ व्या जयंती कार्यक्रमाचे १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येथे सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयातर्फे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रा. प्रकाश नाईक यांचे “समतावादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून पोवाडे, फक्कड, “स्मशानातील सोने” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.