मुंबई, ८ जुलै २०२५ : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणांविरोधात आणि कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर नाराजी व्यक्त करत देशभरातील कामगार संघटनांनी ९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदमुळे अनेक महत्त्वाच्या सेवा आणि सरकारी कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.
काय बंद राहणार?
या बंदमध्ये खालील सेवा आणि यंत्रणा पूर्णतः बंद राहणार आहेत:
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणीतले काम
सरकारी बसेस
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
सरकारी कारखाने
कंपन्यांचे उत्पादन
काय सुरू राहणार?
दरम्यान, काही अत्यावश्यक आणि खासगी सेवा सुरू राहणार आहेत, जसे की:
खासगी कंपन्या
रुग्णालये
वैद्यकीय सेवा
आपत्कालीन सेवा
खासगी शाळा
महाविद्यालये
ऑनलाइन सेवा
या बंदला देशभरातील प्रमुख कामगार संघटनांचा पाठिंबा असून नागरिकांनी गैरसोयी टाळण्यासाठी आवश्यक नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“नवीन धोरणानुसार श्रमिकांना त्याचे संरक्षण मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे बँका त्याला लोन देणार नाहीत, स्वतःचे घर स्वतःची गाडी तसेच त्याच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळणे अवघड होऊन बसणार आहे त्यामुळे शिक्षणामुळे प्रगतीपथावर जाणारा देश मागे राहील अशी ही भीती भविष्यात राहणार आहे. ज्या श्रमिकांच्या कष्टावर भारत देश विकासाची महासत्ता होत चालली आहे त्या श्रमिकांना न्याय देणे त्यांच्या हिताचे कायदे करणे हे सरकारचे कर्तव्य आहे !”
(यशवंत भोसले, अध्यक्ष – राष्ट्रीय श्रमिक आघाडी)