TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पुणे

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

TwinCity News by TwinCity News
December 19, 2025
in पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०२५ याचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे. अशी माहिती महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे, प्रतिमा परदेशी, सहसंयोजिका नेहा भुकण, निलेश रसाळ यांनी दिली.

RELATED POSTS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व संपादक महावीरभाई जोंधळे व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून “तुंबाड फेम” व लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मायासभा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे, वीणा जामकर, दीपक दामले, गिरीश पटेल, अंकुर जे. सिंग, आशिष निनगुरकर, समीर दिक्षित, ऋषिकेश भिरंगी, सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक व चित्रपट समीक्षक उपस्थित राहणार आहेत.

२६ ते २८ डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील एकूण ७० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट स्क्रिनिंगसोबतच विशेष चित्रपट चर्चा, दिग्दर्शकांशी संवाद सत्रे आणि वैचारिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात ऋत्विक घटक यांच्या ‘सुबर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष संवाद सत्र होणार असून. महोत्सवाचा समारोप नितेश हेगडे दिग्दर्शित ‘वाघाची पहाणी’ (Tiger’s Pond)’ या चित्रपटाने होणार आहे.

या वर्षीचा ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार – २०२५’ प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक भान जपणारे कलाकार मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला असून, पुरस्कार वितरण सोहळा २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. हा पुरस्कार प्रसिध्द नाटककार,लेखक व प्राध्यापक, अभिनेते प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित AI चित्रप्रदर्शन, भरवण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाचा विचार मांडणारा हा महोत्सव पुण्यातील चित्रपटप्रेमींसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरत आहे.त्यामुळे पुणे व राज्यातील सिनेमाप्रेमींनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.

Tags: 8th annabhau sathe film festival pune
ShareSendTweet
Previous Post

करिश्मा बारणे यांचा ‘जिंकण्याचा निर्धार’; पक्ष श्रेष्ठींकडे यशस्वी मुलाखत संपन्न

Next Post

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

Related Posts

पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
पुणे

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

December 20, 2025
पुणे

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

September 15, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

July 31, 2025
पुणे

पुणेकरांची मेट्रो बिहारला पळवली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

July 23, 2025
Next Post

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

भोसरीत अमोल डोळस यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; विकासाच्या संकल्पाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews