निगडी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘गुरू’ मानत समाज परिवर्तनाच्या लढ्यात लेखणी आणि लोकसाहित्याच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावली, याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
अभिवादन सोहळ्यास बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, दत्ताभाऊ गायकवाड, नारायण मस्के, बाबासाहेब वाघमारे, संतोष जोगदंड, दशरथ ठाणांबिर आणि प्रकाश बुक्तर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी कार्याला उजाळा देत, त्यांच्या विचारांचा युवा पिढीने आदर्श घ्यावा, असा संदेश दिला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मार्गदर्शन हेच अण्णाभाऊ साठेंच्या संघर्षमय लेखनाचे अधिष्ठान होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.