पिंपळे सौदागर, ९ जुलै २०२५: पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन परिसरात सुरू असलेल्या १२ मीटर व १८ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी आज भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या धीम्या गतीमुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत तातडीने कामाला गती देण्याचे आदेश दिले. त्यांनी ठेकेदार व प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना, पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, त्वरित खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या.
“रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करावा,” अशा सूचनाही त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, कनिष्ठ अभियंता केतकी कुलकर्णी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेडचे समन्वयक भीमाशंकर भोसले, इन्फ्राकिंग कन्सल्टंटचे लीडर पतंगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.