संत तुकारामनगर, अशोक नागरी सहकारी बँकेचे अधिकारी आणि एका व्यक्तीने मिळून एका व्यक्तीची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे सन २०२२ पासून ते २८ एप्रिल २०२२ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.
या प्रकरणात पवन सदाशिव मिसाळ (५३, धानोरी, पुणे) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक नागरी सहकारी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जग्गुजी तनवाणी (४४), कॅशियर प्रकाश कुंभार (४५) आणि शाम सिंग (४०, वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नागरी सहकारी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जग्गुजी तनवाणी, कॅशियर प्रकाश कुंभार आणि फिर्यादीचा मित्र शाम सिंग यांनी फिर्यादीला कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले. त्यांनी फिर्यादीच्या धानोरी येथील ६ गुंठे प्लॉटपैकी ३ गुंठे प्लॉट गहाण ठेवणे अपेक्षित असताना, फिर्यादीची दिशाभूल करून संपूर्ण ६ गुंठे प्लॉट गहाणखत करून घेतले. तसेच, कॅशियर प्रकाश कुंभार याने फिर्यादीकडून प्रोसेसिंग फी, सभासद फी आणि मूल्यांकन फीच्या नावाखाली फिर्यादीचे तीन चेक घेतले. या चेकचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून आरोपी शाम सिंग याच्या नावे सेल्फ म्हणून आणि महाराष्ट्र इंटरप्राईजेस यांच्या नावे टाकून फिर्यादीची एकूण ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत