पिंपरी, पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे, निकिता अर्जुन कदम आणि सौ. प्रियांका कुदले यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना डब्बू आसवानी यांनी पर्यावरणपूरकतेचा अनोखा आदर्श निर्माण केला. कोणताही गाजावाजा न करता, साधेपणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी सायकलवरून निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह पाहता, डब्बू आसवानी यांच्या मागील कार्यकाळातील विकासकामांवर जनता समाधानी असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, युवकांसाठी उपक्रम तसेच महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत केलेल्या ठोस कामांमुळे त्यांनी लोकप्रतिनिधीपेक्षा लोकांचा विश्वासू सहकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
लोककल्याणकारी योजना, सतत जनतेशी संपर्क आणि अडचणीच्या वेळी तत्पर मदत हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून डब्बू आसवानी आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच यावेळी त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना नागरिकांच्या बोलण्यात आणि उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
साधेपणा, पारदर्शकता आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन पुढे चालणारे हे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले आहे.













