थेरगाव , अखिल थेरगाव नवऱात्रोत्सवाचे यंदा ८ वे वर्ष असून, भक्तिभाव आणि उत्साहात या सोहळ्याची सुरुवात दि.२२ सप्टेंबर पासून होणार आहे. या सोहळ्यात “जागर स्त्रीशक्तीचा” या संकल्पनेअंतर्गत धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचा अनोखा संगम नागरिकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती भाजपा थेरगाव महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. करिश्माताई सनी बारणे यांनी दिली.
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम
नवरात्र काळात दररोज रात्री ७ ते १० वाजेपर्यंत रास-गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दररोज रात्री ९ वाजता परिसरातील ५१ महिलांच्या हस्ते दुर्गामातेची आरती होऊन भक्तिरसाचा अनुभव मिळणार आहे.
स्पर्धा व बक्षिसांची मेजवानी
रोजच्या दांडिया आणि रास कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट मुलगा व उत्कृष्ट मुलगी या गटांमध्ये विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दररोज सोन्याची नथ, दोन पारंपरिक पैठणी साड्या, मोबाईल, स्मार्टवॉच यांसह सन्मानचिन्ह देऊन सहभागींचा सन्मान केला जाणार आहे.
मुख्य पारितोषिके
पहिले पारितोषिक : LED टीव्ही
दुसरे पारितोषिक : ओव्हन
तिसरे पारितोषिक : A.C. कूलर
कार्यक्रमाचे ठिकाण :
कै. मोरे महादु बारणे क्रीडांगण, वंदे मातरम चौकाजवळ, थेरगाव
भक्तिरस, उत्साह आणि महिलांच्या सशक्त सहभागामुळे थेरगावातील हा नवरात्र महोत्सव केवळ मनोरंजनाचा नव्हे तर सांस्कृतिक जागराचा केंद्रबिंदू ठरणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवावी,असे आवाहन करिश्माताई बारणे यांनी केले आहे.













