ताथवडे, ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या जर्सीचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन शिवसेना नेते व आमदार सचिन आहिर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास स्थानिक मान्यवर, विविध सोसायटींचे रहिवासी व खेळाडूंची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला शिवसेना पक्षाचे संघटक संजोग वाघेरे, माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, दत्ता वाघेरे, शिवसेना युवा नेते चेतन पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण परिसरात क्रीडाभावना, उत्साह आणि ऐक्याची भावना जागवणारा हा सोहळा जल्लोषात पार पडला.

आमदार सचिन आहेर बोलताना सांगितले की, स्थानिक स्तरावर क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी व युवकांमध्ये संघभावना निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल. चेतन पवार यांच्या या उपक्रमामुळे ताथवडे व पुनावळे भागात सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होईल नागरिकांमध्ये सामाजिक ऋणानुबंध निर्माण होतील. विविध प्रादेशिक विभागातून आलेल्या नागरिकांना खेळाच्या माद्यमातून एकत्र बांधण्याचे काम ही स्पर्धा करेल.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्शवभूमीवर बोलताना ते म्हणाले कि, निवडणूक नियोजन करताना ए.एल.एम. (ALM) area local manegment करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, विद्युत विभाग आणि सर्व लोक प्रशासनाच्या संबंधित संवाद घडवून आणण्यासाठी संयुक्त साधन असावे. त्यानुसार आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून लोकाभिमुक शासन आणि शासनकर्ते तयार होतील व नागरिकांचे प्रश्न लवकर सुटतील.
उत्तम नियोजनाने भरलेला उपक्रम

या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन युवानेते चेतन (अण्णा) पवार यांनी केले असून, “परिसरातील युवकांना एकत्र आणून क्रीडामनभाव विकसित करणे” हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
आकर्षक पारितोषिके
पुरुष गट
पहिलं पारितोषिक – ₹ 99,999
दुसरे पारितोषिक – ₹ 77,777
तिसरे पारितोषिक – ₹ 55,555
महिला गट
पहिलं पारितोषिक – ₹ 77,777
दुसरे पारितोषिक – ₹ 55,555
तिसरे पारितोषिक – ₹ 33,333
विशेष चौथं पारितोषिक – ₹ 22,222
याशिवाय स्पर्धेत बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अशा विविध श्रेणींमध्ये विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
युवांना एकत्र आणणारा प्रेरणादायी उपक्रम

या स्पर्धेमुळे ताथवडे-पुनावळे परिसरात क्रीडासंवर्धन, आरोग्यजागरूकता, संघभावना आणि समाजाभिमुखता वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आयोजक चेतन पवार यांनी व्यक्त केला आहे.
ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उदघाट्न सोहळायची ची सुरूवात ज्या उर्जा आणि उत्साहात झाली, त्यातून पुढील सामन्यांमध्येही रोमांचक क्रीडा वातावरण अनुभवायला मिळणार आहे.













