पिंपरी, पिंपरी चिंचवडला स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ स्पर्धेची तयारी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या अनुषंगाने महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत स्वच्छतेचा नवा चेहरा शोधण्यासाठी मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे नियम:
एक व्यक्ती फक्त एक डिझाईन पाठवू शकते.
डिझाईन पूर्णतः मूळ व स्वयंनिर्मित असावे.
मॅस्कॉटमध्ये स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिक सहभाग, प्लास्टिकमुक्ती, कचरा विलगीकरण आदी विषयांचा समावेश असावा.
डिझाईन प्रेरणादायी, संस्कृतीशी सुसंगत असावे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
…..
असा घ्या स्पर्धेत सहभाग
https://forms.gle/K7L2hN6eS4V3LYto6 या संकेतस्थळावर जाऊन स्पर्धेसाठीचा ऑनलाइन अर्ज भरावा.
नाव, ई-मेल, मोबाईल, पत्ता ही माहिती भरून मॅस्कॉट डिझाईन अपलोड करावे.
डिझाईन मागची संकल्पना थोडक्यात लिहावी आणि अर्ज सबमिट करावा.
……
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मॅस्कॉट डिझाईन स्पर्धा म्हणजे महापालिका राबवत असलेल्या स्वच्छतेबाबतच्या उपक्रमांत नागरिकांना सहभागी होण्याची एक संधी आहे. नागरिकांच्या सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी, त्यांना स्वच्छतेबाबत सजग करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…….
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अनुषंगाने तयारी सुरू असून नागरिकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी मॅस्कॉट डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून स्पर्धेत सहभागी व्हावे
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका