TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

TwinCity News by TwinCity News
August 3, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
898
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशी बांधवांनी आपली संस्कृती जपून शहराला ‘मिनी खान्देश’चे स्वरूप दिले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढले.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. हा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून, आपल्या संस्कृती आणि परंपरेचा जागर असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज दुपारपासूनच उत्सवाची सुरुवात श्री कानबाई मातेच्या भव्य मिरवणुकीने झाली. श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून सुरू झालेली ही मिरवणूक आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे पोहोचली. मिरवणुकीमध्ये शिरपूर येथील गोल्डन बँड आणि अमळनेर येथील राधे कृष्ण बँडच्या संगीताने एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण धुळे आणि नंदुरबार येथील आदिवासी समाज बांधवांचे नेत्रदीपक नृत्य ठरले. पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर कलश घेऊन चालणाऱ्या महिला आणि पारंपरिक पोशाखातील पुरुषांचा सहभाग लक्षवेधी होता.

महाजन आपल्या भाषणात म्हणाले, “आज पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो खान्देशी बांधवांना एकत्र आलेले पाहून मला खूप आनंद होत आहे. हा उत्सव केवळ पूजा-अर्चा किंवा विधीचा कार्यक्रम नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा जागर आहे. पिंपरी-चिंचवड हे एक असे शहर आहे, जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत आणि या शहराने सर्वांना आपलेसे केले आहे. कामासाठी, रोजगारासाठी आपण इथे आलो असलो तरी, आपली संस्कृती आणि परंपरा आपण विसरलेलो नाही, हेच या उत्सवातून सिद्ध होत आहे. खान्देशाची संस्कृती, अहिराणी भाषा आणि लोककला समृद्ध आहेत. आपली ही समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. कानबाई माता ही खान्देशातील प्रत्येकाच्या घरात असलेली देवता आहे. या मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो, अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहात, ही एक चांगली गोष्ट आहे. हा उत्साह असाच कायम राहो!”

सायंकाळी आहेर गार्डन येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री कानबाई मातेचे पूजन करून उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “खान्देशातील बांधवांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन आपली संस्कृती आणि परंपरा जपली आहे, हे पाहून मला अभिमान वाटतो. या शहरात ‘मिनी महाराष्ट्र’ पाहायला मिळतो आणि आजचा हा उत्सव त्याचाच एक भाग आहे. कानबाई माता ही शक्तीचे प्रतीक असून, तिचे आशीर्वाद आपल्याला सदैव मिळोत. खान्देशी बांधवांनी आपले पारंपरिक लोकसंगीत, आपली भाषा आणि प्रथा जपायला हव्यात.”

कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश चव्हाण, शंकर जगताप, उमा खापरे, राजू मामा भोळे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील, सुरेखा जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि सर्व खान्देशी समाज बांधव उपस्थित होते. उत्सवाच्या आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

नामदेव ढाके यांचे प्रास्ताविक
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी प्रास्ताविकात उत्सवाचा मुख्य उद्देश सांगितला. ते म्हणाले, “या उत्सवाचा उद्देश पिंपरी-चिंचवडमधील सर्व खान्देशी बांधवांना एका व्यासपीठावर आणणे आहे. आपल्याला आपल्या मूळ गावापासून दूर राहावे लागत असले तरी, आपल्या गावाकडील मातीचा सुगंध, आपली संस्कृती आणि आपले पारंपरिक सण-उत्सव आपण विसरू शकत नाही. खान्देशातील संस्कृतीची ओळख आपल्या पुढील पिढीला करून देणे, हे आपले कर्तव्य आहे.”

रात्री ८ वाजल्यापासून श्री कानबाई मातेच्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सुरू झाला. श्री कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप, शिरपूर-धुळे-पुणे चे गायक सागर देशमुख, दिलीप शिंदे, कुणाल महाजन आणि दिनेश शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात भक्तिगीते सादर करून उपस्थितांना भक्तीरसात चिंब केले.
हा उत्सव पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरला आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता चौधरी यांनी केले, तर हेमंत चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्या, सोमवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्री कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीने या तीन दिवसीय उत्सवाचा समारोप होईल. ही मिरवणूक आहेर गार्डन येथून सुरू होऊन जाधव घाट, रावेत येथे विसर्जित होईल.

Tags: Kaanbai Mahotsav Pimpri ChinchwadKhandeshKhandesh MarathaKhandesh SanskrutiNamdev Dhake
ShareSendTweet
Previous Post

‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ नियोजनासाठी ११ ऑगस्टला विशेष बैठक

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ नियोजनासाठी ११ ऑगस्टला विशेष बैठक

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews