पिंपरी, पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे, डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर आणि राहुल भोसले यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा आज सायंकाळी 4.00 वाजता, नेहरूनगर येथील शीतल हॉटेल समोर पार पडणार असून, प्रभागातील विकासकामे, भविष्यातील योजना आणि महापालिकेतील सक्षम नेतृत्वाचा संदेश देण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांनी सांगितले.
स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका, विकासाभिमुख अजेंडा आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपली आघाडी अधिक मजबूत करत असल्याचे चित्र या विजय संकल्प सभेतून स्पष्ट होणार असल्याचे माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी सांगितले.
“प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित आहे,” अशी प्रतिक्रिया उमेदवार सारिका मासुळकर यानी व्यक्त केली.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जात आहे,” अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ बनसोडे यांनी दिली.













