पिंपळे सौदागर, दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (२८ जुलै) दुपारी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ घडली.
अक्षय बापु सागर (२६, पिंपळे सौदागर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्मीकांत राजेश रत्नपारखी (२९, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची ४५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १४/एलवी ९६९१) आरोपी अक्षय याने चोरून नेली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळेत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.