TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या राखीव जागेत पिंपरी महापालिकेचा पुन्हा खोडसाळपणा; स्मारक समितीकडून संताप व्यक्त

TwinCity News by TwinCity News
July 24, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



पिंपरी, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागील जागा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या राखीव जागेवर महापालिकेने नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याबाबतचा बोर्ड लावल्याने आंबेडकरी जनतेत संतापाची लाट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. याबाबत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आह़े.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे aबाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, तुकाराम गायकवाड, विनोद गायकवाड, राजेंद्र साळवे, संतोष जोगदंड, राजू गायकवाड, दत्ता ठाणांबीर, प्रमोद शेरे, मुकुंद रणदिवे, रामभाऊ ठोके, नारायण म्हस्के, संजय ठोंबरे, बाबासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

पिंपरी येथील भीमसृष्टी मागील जागेत त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासुन सुरू आहे. त्याबाबत आंबेडकरी जनतेच्या वतीने अनेकवेळा आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करण्यात आले. वेळोवेळी महापालिका आणि राज्यशासनाला त्याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहे. परिणामी नागरिकांच्या मागणीस अनुसरून उपलब्ध जागा माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव करण्याबाबतचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला होता. तसेच स्मारक उभारण्यासाठी निधी देखील महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे. ही जागा पीएमपीएमएल कडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतची प्रक्रिया देखील पार पडली आहे. स्मारकासाठी आवश्यक असणार्‍या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. असे असताना याठिकाणी स्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी अपेक्षा आंबेडकरी जनतेच्या वतीने व्यक्त करण्यात येत होती. 

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेने नव्याने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आखाड्यात स्मारकासाठी राखीव असलेल्या जागेवर पुन्हा आरक्षण टाकल्याने शहरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. परिणामी नागरिकांच्या वतीने आंदोलनं आणि उपोषण करण्यात आले. तसेच दहा हजारांहून अधिक नागरिकांकडून त्याबाबत महापालिकेकडे लेखी हरकती  देखील नोंदविण्यात आल्या आहेत. याविषयी सुनावणी होणे अपेक्षित असताना महापालिकेने आरक्षित जागेवर नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याबाबतचा बोर्ड लावल्याने महापालिकेच्या विरोधात आंबेडकरी जनतेत संतापाची लाट निर्माण झाली असून संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर नियोजित जागेवर टाकण्यात आलेल्या आरक्षणावरील हरकतींवर जोपर्यंत सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे बोर्ड, फ्लेक्स लावू नये अथवा कोणतेही कामकाज केले जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन  महापालिका आयुक्तांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने देण्यात आले आहे.

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच  शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी यामागील मोकळी जागा ही माता रमाई स्मारकासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे असा महापालिकेने त्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतानाही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य मंदिराचे काम या ठिकाणी चालू होणार आहे असा खोडसाळ प्रचार करणारा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला त्याचा निषेध विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला व महापालिकेतील वैद्यकीय पदाधिकाऱ्यांना जाब विचारून तो बोर्ड काढण्यास भाग पाडले.  पुन्हा असा प्रकार घडल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” मा.बाळासाहेब रोकडे – निमंत्रक तथा सामाजिक कार्यकर्ते

Tags: B.R AmbedkarBhimsrusthiDevelopment Plan PcmcDP PlaneDr. Babasaheb AmbedkarPCMCPCMCIIndiaPimpri ChinchwadRamai AmbedkarRamai SmarakShekhar Singh
ShareSendTweet
Previous Post

जाधववस्ती बोगस एस आर ए प्रकरणी अण्णा बोदडे, आर के डेव्हलपर्स, ग्रेस डेव्हलपर्स आणि वाडकर पाटील असोसिएट यांच्यावर कारवाई करा :- मच्छिंद्र तापकीर   

Next Post

पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

महापालिकेच्या शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळ्याप्रकरणी अटक; शाळेतील काही सीसीटीव्ही  कॅमेरे बंद; महापालिकेला उशिरा जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews