पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
शेखर सिंह यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे, प्रशासनिक सुधारणा आणि नागरी सुविधांच्या उभारणीवर भर दिला. त्यांनी एकूण तीन वर्षे दोन महिने या पदावर कार्य केले.
दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर आयुक्त पदाचा तात्पुरता कार्यभार पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हर्डीकर हे पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत.













