भोसरी, भोसरी येथील ओम साई लॉटरी, विशाल वाईन्स शेजारी, पीएमटी चौक येथे इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (१६ जुलै) सायंकाळी करण्यात आली.
अमन राजकुमार कोहली (३२, आकुर्डी), केतन दिलीप घाडगे (३२, धावडे वस्ती भोसरी), जुगार खेळणारे बसवेश्वर सभांप्पा देवकर (५२, महादेव नगर, भोसरी), अमोल अभिमन्यु शिंदे (३८, गवळी नगर, भोसरी), गुलाब रफिक शेख (२५, बालाजी नगर, भोसरी), करण भीमाशंकर कांबळे (३४, आदेश नगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ताटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद आरोपी इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळत होते. या जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये ८० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.