खेड तालुक्यातील रासे येथे ओढ्याच्या बाजूला सुरु असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा मारला. या कारवाई मध्ये २.८७ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (७ जुलै) सकाळी करण्यात आली.
अर्जुन बिरबल राठोड (४१, शिंदे वस्ती, रासेफाटा, खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन याने रासे गावात ओढ्याच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन लाख ८७ हजार रुपये किमतीचे आठ हजार २०० लिटर रसायन नष्ट केले.