ताथवडे, येथील एका सोसायटीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सोमवारी (२१ जुलै) सकाळी कोहीनूर सफायर-२ सोसायटी, ताथवडे येथे घडली.
या प्रकरणी महेश जिजाराम शिंदे (५३, काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश श्रीकर मराठे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोहीनूर सफायर-२ सोसायटीतील आय-विंग क्लब हाऊस येथून राऊंड मारत असताना, डी/२०४ मध्ये राहणारे आरोपी व्यंकटेश आणि त्याची पत्नी फिर्यादीजवळ आले. त्यांनी “रात्री फोनवर तूच होतास ना?” असे म्हणत, आरोपी महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाईपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले. तसेच, आरोपी व्यंकटेश याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.