TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरीत भाजपचा मनसेला धक्का;मनसेची संपूर्ण कायदा आघाडीच भाजपमध्ये सामील!

TwinCity News by TwinCity News
July 12, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



पिंपरी, दि.१२ जुलै २०२५:आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या जनहित व विधी कायदा सेलच्या शहराध्यक्षा ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांनी आपल्या संपूर्ण कायदा सेलच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. बापू काटेंच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे मनसेची शहरातील ताकद लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे मानले जात आहे.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा


शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड भाजप सध्या दमदार वाटचाल करत आहे. नुकतीच पार पडलेली तिरंगा भारत यात्रा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त शहरात आयोजित विविध कार्यक्रम, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाला साजरे करणारे ‘मोदी@११’ अंतर्गत उपक्रम यांसारख्या अनेक कार्यक्रमांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेला काटे यांनी हा राजकीय धक्का दिला आहे.


ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांच्यासमवेत मनसे कायदा सेलचे महत्त्वाचे पदाधिकारी ॲड. श्रीधर यलमार, ॲड. रुचिरा कर्वे, ॲड. विद्या राठोड, ॲड. श्रुती जोगळेकर, ॲड. अमोल वाघ, आणि ॲड.रोहन देशपांडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना ॲड. प्रीतिसिंह परदेशी म्हणाल्या, “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवून त्यांनी शत्रूराष्ट्र पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गेल्या ११ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत भारत नेत्रदीपक प्रगती करत आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारही महाराष्ट्रात चांगले कार्य करत आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या संपर्कामुळे मी व माझे सर्व सहकारी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहोत.”


या पक्षप्रवेश सोहळ्याला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजप राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य ॲड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस शैला मोळक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, दिनेश यादव, हरिभाऊ चिंचवडे, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, दीपक गांगुर्डे, आदित्य काटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjppcmcmanaseMNSPCBJPPimpri Chinchwad BJPShatrughn Kate
ShareSendTweet
Previous Post

‘आप’चा महापालिकेच्या इंग्रजी शाळांवर आक्षेप; खासगीकरण करत असल्याचा आरोप

Next Post

पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय इंदलकर यांची बिनविरोध निवड

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय इंदलकर यांची बिनविरोध निवड

सोमवारी शहरातील हॉटेल, परमिट रूम आणि बार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews