पिंपरी, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकींचा आखाडा आता रंगू लागला आहे. अनेक दिग्गज आणि अनुभवी चेहऱ्यां समोर, नवीन चेहऱ्यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे कधीकाळी एकहाती विजय मिळवलेल्या अनेक नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत धास्ती भरली आहे.
असेच काहीसे तगडे आव्हान पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ( ड ) मध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागात दोन टर्म नगरसेवक म्हणून राहिलेले अनिल टिंगरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शशिकांत टिंगरे यांनी दंड थोपटले आहेत.
शशिकांत टिंगरे यांचा मागील १० वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव तसेच लोकांसोबत असलेला त्यांचा आपलेपणाचा संवाद आणि आपल्या कामातून त्यांना मिळालेली पसंती, यंदाच्या निवडणुकीत माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्यासमोर मोठे आव्हान तयार करणारी ठरत आहे.
प्रभाग क्रमांक १ ( ड ) मधील प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा पाहता, लोकांनी सध्यातरी नगरसेवकाच्या शर्यतीत पहिल्यांदाच उतरलेल्या शशिकांत टिंगरे यांना स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पण गर्दीतले मत जो पर्यंत मोजणीत येत नाही अगदी तो पर्यंत निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही.
पण पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ( ड ) मध्ये मात्र नगरसेवक पदासाठीची लढाई चुरशीची होणार यात शंका नक्की. फक्त आता विद्यमान माजी नगरसेवकांना, समोर उभे राहिलेले आव्हान पेलवणार का? की, या आखाड्यात त्यांना धोबीपछाड मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.













