TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

सेवा विकास बँकेतील धक्कादायक प्रकार; शासनाच्या परवानगीशिवाय बँक बंद व २०५ कामगाराची कपात

TwinCity News by TwinCity News
November 16, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये शासनाची व कामगार विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे 205 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना Liquidator यांनी कामावरून कमी केले होते.राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती भोसले यांनी पिंपरी येथे दिली.

युवानेते दिनेश पाटील, संघटनेचे कार्यकारणी सदस्य मिलिंद देशपांडे व सोमनाथ वीरकर तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने राकेश गायकवाड,गणेश शेलार, नजीम शेख, गजानन होंडे, सागर बोडके, विनोद साळवे, संदीप धावडे, गणेश काशिद,सुजितकुमार चव्हाण व मोठ्या संख्येने बँक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,मागील तीन वर्षांपासून बँकेचे नियमित कामकाज बंद असून केवळ कर्जवसुलीचे काम सुरू आहे. दीर्घकाळ सेवा बजावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2022 मध्ये बेकायदेशीररित्या सेवा समाप्तीची पत्रे देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक अचानक बंद करताना कोणतीही वैध कारणे सांगण्यात आलेली नाहीत तसेच महाराष्ट्र शासनाकडून बँक बंद करण्याची किंवा मोठ्या प्रमाणावर कामगार कमी करण्याची शासनाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून 205 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकजण उपजीविकेअभावी अत्यंत अडचणीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. एका कर्मचाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली असून दुसऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
    
दरम्यान, बँकेवर नियुक्त Liquidator यांनी कर्मचाऱ्यांना “बँक लवकरच सुरू होईल व देणी दिली जातील” अशी आश्वासने दिली असली तरी तक्रार केली तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होईल, असा दबाव आणला असे कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परिणामी कर्मचारी कामगार कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यास घाबरत होते.यातील काही कर्मचारी ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’ या संघटनेचे सदस्य झाले असून, बँक बेकायदेशीररित्या बंद करण्याबाबतची तक्रार औपचारिकरीत्या दाखल करण्यासाठी त्यांनी संघटनेला अधिकृतरित्या अधिकार दिले आहेत. तसेच कामगार कार्यालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि उच्च न्यायालयातही आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची तयारी संघटनेने दर्शविली आहे अशी माहिती कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

   कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार कार्यालय पुणे यांना प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बँकेकडून परवानगी न घेता करण्यात आलेल्या सेवा समाप्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सहाय्यक कामगार आयुक्त यांनी बँक बेकायदेशीर रित्या बंद केली असून ती पूर्ववत चालू करावी व बँकेतील कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे पत्र Liquidator ला दिले असून कर्मचारी कामावर रुजू होण्यास आल्याने Liquidator चे धाबे दणाणले आहेत.

बेकायदेशीर कामगार कपात आणि बँकेचे विभाग बंद करणे हे लिक्विडेटरला भोवणार असून कामगार कार्यालय त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले दाखल करू शकते. यावर बँक लिक्विडेटर काय भूमिका घेतात याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: seva vikas cooprative bankyashvant bhosale
ShareSendTweet
Previous Post

बिहारचा निर्णय म्हणजे भाजपवरील विश्वास! – शंकर जगताप

Next Post

सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात ५० रक्त पिशव्यांचे संकलन

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात ५० रक्त पिशव्यांचे संकलन

मालमत्ता कराच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर लागणार २ टक्के विलंब दंड;थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews