काळेवाडी, अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (१९ जुलै) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नढे कॉर्नर, विजयनगर बस स्टॉपजवळ, काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणी नागेश गणेश डोके (३६) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पोवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश डोके हे त्यांची मोटारसायकल (एमएच १४/एमजे ६१६९) वरून काळेवाडी फाट्यावरून त्यांच्या राहत्या घराकडे जात होते. त्यावेळी नढे कॉर्नर, विजयनगर बस स्टॉपजवळ, काळेवाडी येथे एका अज्ञात टेम्पोने त्यांना पाठीमागून येऊन धडक दिली. या धडकेमुळे नागेश यांच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.