पुणे, पवना धरण आता शंभर टक्के क्षमतेने भरले असून धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. सध्या धरणातून जलविद्युत केंद्राद्वारे १४०० क्युसेक आणि सांडव्याद्वारे १४६० क्युसेक असा एकूण २८६० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी दोन वाजेपर्यंत सांडव्याद्वारे होणारा विसर्ग वाढवून ४२६० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण विसर्ग ५६६० क्युसेकपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ किंवा घट होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पवना नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात न जाणे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पूरनियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे.