TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, October 14, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, October 14, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

TwinCity News by TwinCity News
August 29, 2026
in गुन्हेगारी, पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जवळपास ४ कोटींच्या फसवणुकीची तक्रार; संबंधित कंपन्यांचीही सखोल चौकशी करण्याचे आदेश

पुणे, दि. २९ ऑगस्ट २६: नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या Radiant IT Consultancy प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. जवळपास चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार असून, कंपन्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तपास व कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

भाजप युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते ओंकार शिवाजी तुपे यांनी निवेदन दिले. Radiant IT Consultancyकडून फ्रेशर्स विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचे सांगून काही विद्यार्थ्यांकडून चार लाख, तर काहींकडून आठ लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

रक्कम घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना Caryanam India, Cybromatic, GTastrix, Accure Softtech, Lean Quality IT Services आणि Whitetable Technology या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पाठवण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, काम करून घेतल्यानंतर अपेक्षित वेतन देण्यात नसल्याच्या तक्रारी आहेत. काही विद्यार्थ्यांचे १० ते १२ महिन्यांचे वेतन थकीत असल्याचा दावा आहे. काही विद्यार्थ्यांकडून दोन ते तीन महिने काम करून घेतल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचीही तक्रार आहे.

या प्रकरणातील बँक व्यवहार, ई-मेल, मेसेज आणि अन्य पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. Radiant IT Consultancyचे संचालक सैफ मनियार यांच्यावर यापूर्वीच कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, Mind Technology, City Vista, खराडी येथील प्रकरणातही जवळपास ८० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणाचीही चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन कृष्णराज महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना न्याय आणि रोजगार मिळवून देण्यासाठी ओंकार शिवाजी तुपे यांचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED POSTS

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

Tags: #omkartupe #omkartupeshivsenabjp omkar tupe
ShareSendTweet
Previous Post

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

Next Post

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

Related Posts

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश
गुन्हेगारी

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

October 14, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात
पुणे

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026
पुणे

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026
गुन्हेगारी

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
Next Post

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

October 14, 2026
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (33)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews