TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, September 9, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, September 9, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

TwinCity News by TwinCity News
September 9, 2026
in पिंपरी चिंचवड, पुणे
Reading Time: 1 min read
0
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे–तळेगाव, “कोणीतरी श्रीमंत माणूस आमच्या मुलीला घेऊन जाईल, निदान ती उपाशी तरी झोपणार नाही…” या विचाराने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका दाम्पत्याने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूतील भंडारा डोंगरावर सोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीला चांगले आयुष्य मिळावे, या अपेक्षेने आई-वडिलांनी हा टोकाचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि अखेर त्यांनी स्वतः पोलिसांसमोर हजेरी लावली.

देहूजवळील धार्मिक महत्त्व असलेल्या भंडारा डोंगरावर रविवारी (६ सप्टेंबर) अजय शिवशंकर यादव (२३) आणि त्यांची पत्नी खुशबू अजय यादव (२२, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे दीड वर्षांच्या मुलीसह आले होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचे त्यांच्या म्हणणे होते. त्यामुळे एखाद्या दयाळू व्यक्तीला ही मुलगी मिळेल आणि तिचे आयुष्य सुखकर होईल, या आशेने त्यांनी चिमुकलीला डोंगरावर सोडले.

चिमुकलीला पाहून पोलिसांचेही काळीज हेलावले

डोंगरावर एकटी फिरणारी चिमुकली स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल केले.

महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी चिमुकलीची आईप्रमाणे काळजी घेतली. तिला खाऊ दिला, खेळणी दिली आणि तिच्यासोबत खेळल्या. चिमुकली पूर्णपणे निरोगी असून तिच्या चेहऱ्यावर कोणतीही दुखापत नव्हती. तिचे निरागस हास्य पाहून पोलिस कर्मचारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांचेही डोळे पाणावले.

पोलिसांसमोर उघड झाले सत्य

मुलीला सोडल्यानंतर दाम्पत्याला आपल्या कृतीचा पश्चात्ताप होऊ लागला. सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी अजय आणि खुशबू स्वतः तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

सुरुवातीला त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. “ही मुलगी आम्हाला मुंबईत बेवारस अवस्थेत सापडली होती. आर्थिक परिस्थितीमुळे तिचा सांभाळ करणे शक्य नसल्याने तिला भंडारा डोंगरावर सोडले,” असे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अखेर दोघांनीही सत्य कबूल केले.

“ही आमचीच मुलगी आहे. आमच्याकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत. तिचा सांभाळ करणे अशक्य झाल्याने, कोणीतरी चांगला माणूस तिला घेऊन जाईल आणि चांगले आयुष्य देईल, या आशेने तिला सोडले,” अशी कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मजबुरी असली तरी कायद्याची कारवाई

आई-वडिलांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या बिकट असली तरी चिमुकलीला अशा प्रकारे बेवारस सोडणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अजय यादव आणि खुशबू यादव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चिमुकलीची प्रकृती ठणठणीत

वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली अंबिके यांनी सांगितले की, चिमुकलीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ती सकारात्मक स्वभावाची असून अजिबात रडत नाही. तिचे वय सुमारे दीड वर्षे आहे. तिच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल लवकरच प्राप्त होतील.

RELATED POSTS

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

#talegavdabhadepolice #twincitynews #bhandardongarchildmissing #missingchild #pimprichinchwadpolice #pimpripolice #ycmchildcare #policehumanity #humanity

Tags: #talegavdabhadepolice #twincitynews #bhandardongarchildmissing #missingchild #pimprichinchwadpolice #pimpripolice #ycmchildcare #policehumanity #humanity
ShareSendTweet
Previous Post

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

Related Posts

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात
पुणे

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
गुन्हेगारी

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (181)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews