पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे करण्यात येते. त्याअनुषंगाने नागरिक आणि प्रशासन यांची संयुक्त नियोजन बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात १४ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत नागरिकांनी विविध महत्त्वपूर्ण सुचना व मुद्दे मांडले.
बैठकीमध्ये प्राप्त सूचना
भक्ती शक्ती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाची उंची वाढविण्यात यावी, स्मारक परिसरातील कारंजे सुस्थितीत ठेवावे, स्मारक परिसरात वर्षभर साफसफाई करण्यात यावी तसेच LED बोर्ड बसविण्यात यावे, अण्णाभाऊ साठे आणि लहुजी उस्ताद यांच्या जीवनावर आधारित माहिती देणारी शिल्पसृष्टी उभारण्यात यावे, अण्णाभाऊ साठे यांचा जुना अर्धाकृती पुतळा योग्य ठिकाणी पुनर्रस्थापित करण्यात यावा, यमुनानगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, २०२४- २५ साली संपन्न झालेल्या अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वातील आर्थिक गैरव्यवहार नागरिकांसमोर मांडण्यासाठी फ्लेक्स लावण्याची परवानगी देण्यात यावी, प्रबोधन पर्वात नवीन आणि ग्रामीण कलाकारांना आमंत्रित करण्यात यावे, प्रबोधन पर्वाच्या कालावधीत निगडी येथील मेट्रो स्टेशन उभारणीचे कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात यावे, प्रबोधन पर्वाची प्रसिद्धी व्यापक स्वरुपात करण्यात यावी, अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब देण्यात यावेत, शाळांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करावी तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी विविध स्पर्धा आयोजित करावे, राज्यशासनाला “आर्टी” साठी जागा ऊपलब्ध करून द्यावे, जयंतीदिनी आरोग्य विषयक उपक्रम राबवा, पुस्तक महोत्सव आणि साहित्य दिंडी आयोजित करण्यात यावी, प्रबोधन पर्वात सहभागी झालेल्या नागरिकांची नोंदणी करून डेटा तयार करण्यात यावे. कलारत्न,समाजभूषण पुरस्कार देण्यात यावेत, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आणि रोजगार योजना तयार करण्यात यावे, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या उमेदवारांना नोकर्या उपलब्ध करून द्याव्यात,शहराच्या स्वच्छतेविषयी प्रभावी भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूत म्हणजेच अवकारीका सिनेमा कलाकारांचा सन्मान करण्यात यावा, वृक्षारोपण मोहिम,आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन, परिसंवाद,महिलासांठी कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच कार्यक्रमास मान्यवरांना निमंत्रित करावे
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसदस्य भगवान शिंदे, काळूराम पवार,माजी नगरसदस्या कमल घोलप, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता विजय वायकर, डी.पी.पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, मेट्रो व्यवस्थापनाचे धनंजय कृष्णन,युवराज गावंडे, उप अभियंता ए.ए.कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे,संदीपान झोंबाडे, नितीन घोलप,संजय ससाणे,युवराज दाखले, अरुण जोगदंड, सुनिल भिसे, नाना कसबे, डी.पी.खंडाळे,सतिश भवाळ, सुनिल भिसे, आशाताई शहाणे, लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते भाई विशाल जाधव,चंद्रकांत लोंढे, संजय धुतडमल, उत्तम कांबळे, युवराज तिकटे, बाबासाहेब पाटोळे, गणेश अवघडे, शिवाजी साळवे, श्रीमंत गायकवाड, शिवाजी चव्हाण, साहेबराव थोरात, कैलास पाटोळे, शिवाजी खडसे, विठ्ठल वाघमारे, तात्यासाहेब पाटोळे,उषा आल्हाट, धिरज सकट, सचिन कसबे, नाना सगर, सनी सकट, काशिनाथ आल्हाट,लक्ष्मण लोखंडे, बाळासाहेब खंदारे, मारूती सोनटक्के, ऋषिकेश गणगे, नानासाहेब नरमिंगे, अविनाश कांबीकर, राजू जाधव, शाहीर रामलिंग जाधव, राम चौधरी, नाना कांबळे, अर्जुन नेटके, मंदार बागव, विकास गायकांबळे, मयुर गायकवाड, सुरेश मिसाळ, शिवाजीराव साबळे, रामदास कांबळे, अण्णासाहेब कसबे, भानुदास साळवे, महादू आडागळे, विष्णू कसबे, शंकर खवळे, आनंद कांबळे, वैभव वायकर, राजू आवळे, सुनील खुडे, सोमनाथ कांबळे, गणेश अवघडे, राम साठे, उषा आल्हाट, के.के. आल्हाट, राकेश भिलारे, स्वप्नील वाघमारे आदी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.