TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लोकमान्य टिळक यांचे पणतू, डॉ. दीपक टिळक यांचे निधन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

TwinCity News by TwinCity News
July 16, 2025
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, ‘लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,’ अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू, दैनिक केसरीचे विश्र्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक जयंत टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

RELATED POSTS

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

स्वतःच्या खाजगी मोबाईलवरून फोटो-व्हिडिओ न काढण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, लोकमान्य टिळक आणि त्यांचे नातू दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. डॉ. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags: dipak tilakkesarikesariwadalokmany tilakPUNEtilaktilak University
ShareSendTweet
Previous Post

२१ जुलै पर्यंत हरकती व सूचना सादर करा; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Next Post

शिवणे येथील मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक

Related Posts

महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026
महाराष्ट्र

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

July 18, 2025
महाराष्ट्र

स्वतःच्या खाजगी मोबाईलवरून फोटो-व्हिडिओ न काढण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश

July 15, 2025
पिंपरी चिंचवड

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

June 23, 2025
इतर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

June 19, 2025
पिंपरी चिंचवड

रोटरी क्लब तर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅगचे वाटप!

June 19, 2025
Next Post

शिवणे येथील मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक

काळाखडक येथे ९६ झोपड्यांवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews