भोसरी, एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री राजमाता जिजाऊ कॉलेजच्या मागील मैदानाजवळ, टेल्को रोड, भोसरी येथे करण्यात आली.
याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हर्षद कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय संजय गुंड (२८, लांडेवाडी, भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाता जिजाऊ कॉलेजच्या मागील मैदानाजवळ, टेल्को रोड, भोसरी येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.













