TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

उमेश काटे यांच्या नेतृत्वाखाली साकारली तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती; सौदागरात भाविकांवर अवतरला भक्तिरसाचा महापूर”

TwinCity News by TwinCity News
September 25, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपळे सौदागर : नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नवनाथ मित्र मंडळाने यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. “मातेचं दर्शन मिळणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. यावर्षी तुळजापूरची माया आपल्या गावी अनुभवता येते, हे आमचे सौभाग्य आहे,” अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा


माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष उमेश काटे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा दिमाखात पार पडत आहे. याआधी २२ सप्टेंबर रोजी ग्रामदैवत ज्योतीबाच्या साक्षीने, ढोल-ताशांच्या गजरात,भगव्या पताका आकाशी फडकवत व भंडाऱ्याची उधळण करीत भव्यदिव्य मिरवणुकीत “सौदागरच्या माऊलीचे आगमन” झाले. २ ऑक्टोबर पर्यंत हा उत्सवधार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी उत्सवाच्या निमित्ताने ठेवली आहे. तुळजाभवानी मातेच्या सहवासाने पिंपळे सौदागर व रहाटणी परिसर उत्साह आणि आध्यात्मिकतेने न्हाऊन निघाला आहे.



मंडळाचे अध्यक्ष उमेश काटे म्हणाले,
“नवरात्री हा फक्त उत्सव नसून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सोहळा आहे. तुळजाभवानी मातेची प्रतिकृती उभारून भाविकांना आपल्या गावातच दर्शन घेण्याची संधी मिळते, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हा उत्सव महिलाशक्तीच्या प्रेरणेवर आधारित आहे. नवरात्री ही ‘नारीशक्ती’ची पूजा आहे, आणि या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आहोत. समाजातील स्त्रिया आत्मनिर्भर आणि प्रगतीशील झाल्या तर खरी शक्ती निर्माण होते. भविष्यातही अशाच पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपत सामाजिक उपक्रम राबवण्याचे आमचे ध्येय आहे.”



पिंपळे सौदागरात सुरू असलेल्या या नवरात्री उत्सवात तुळजाभवानी मातेचे हजारो भाविक दररोज दर्शन घेत असून मंदिराचा “राजे शहाजी मल्हार” प्रवेशद्वार भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. या प्रवेशद्वारावर भाविकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत  नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे परिसरात भक्तीभाव आणि सांस्कृतिक जल्लोषाचे अनोखे वातावरण पाहायला मिळत आहे.   तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने भाविकांसाठी भव्य  वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उमेश काटे यांनी यावेळी दिली आहे.



दरम्यान, पिंपळे सौदागर स्पोर्ट अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (PLESCO) च्या वतीने भव्य रास-डांडिया नाईट्स ४.o चे आयोजन २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. दांडियाच्या अनोख्या अविष्कारात सहभागी होण्यासाठी “प्लेस्को” चे संस्थापक अध्यक्ष उमेश काटे यांच्या कार्यालयात नोंदणी सुरू असून सर्वांसाठी मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन PLESCO च्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: CORPORATORdandiya nightsgarbaNana KateNavratri UtsavPCMCPimple SaudagarPLESCOplesco dandiya 4.0Umesh Kate
ShareSendTweet
Previous Post

भक्ती शक्ती चौकातपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा महाउत्सव….

Next Post

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

दांडिया-रास गरब्यात तरुणाईची धमाल; करिश्मा बारणे आयोजित नवरात्री उत्सवात सांस्कृतिक वारशाचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews