TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

TwinCity News by TwinCity News
June 18, 2025
in इतर, पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, दि. १८ जून२०२५: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २२जून २०२५ रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे २ वा. पासून ते २४ जून २०२५ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

२४ ते २५ जून २०२५रोजी सासवड- जेजुरी-ते वाल्हे दरम्यान जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. २४ जून रोजी पहाटे २ वा. पासून ते २५ जून रोजी रात्री १२ वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येणार आहे.

२६ जून २०२५ रोजी लोणंद येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २६ जून रोजी सकाळी २ वा. पासून ते २६ जून रोजीचे सायं. ५ वा.पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे.

२६ जून ते २८ जून या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:
पालखी २३ जून रोजी लोणीकाळभोर ते यवत दरम्यान यवत येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २३ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे.

२४जून रोजी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे मुक्कामी असणार  दरम्यान २४ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

२५ जून रोजी वरवंड ते उंडवडी ता. बारामती दरम्यान उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी   २५ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस तसेच तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.

२६ जून रोजी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून दरम्यान २६ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील.

२७ जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २७ जून रोजी सकाळी २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.

२८ जून रोजी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून २८जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते २९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक  इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.

२९ जून रोजी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असून पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस -जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.

३० जून रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलुज-बावडा-नातेपूते बारामती तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. ३० जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गान वळविण्यात येणार आहे.
१ जुलै रोजी इंदापूर ते सराटी दरम्यान सराटी येथे मुक्कामी असून पहाटे २ वाजल्यापासून रात्रौ १२.००वाजेपर्यंत तसेच ३ जुलै रोजी पहाटे २वा पासून ते दुपारी १२वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED POSTS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

Tags: ashadhiwariAshadivaridehujagadguruMaharashtraPUNEpune districtsant dnyaneshwarsant tukaramsant tukaram maharajsant tukaram maharaj sansthan dehutraffictraffic diversne
ShareSendTweet
Previous Post

अजित पवार विरोधात महेश लांडगेंचे श्रेययुद्ध; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी,भाजपा आमने-सामने

Next Post

आकुर्डीत ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; भर पावसाळ्यात महापालिकेचे दुर्लक्ष

Related Posts

पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
पुणे

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

December 20, 2025
पुणे

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

December 19, 2025
पुणे

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

September 15, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
इतर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा होणार अजित पवार यांच्या हस्ते सन्मान -भाऊसाहेब भोईर

August 20, 2025
Next Post

आकुर्डीत ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; भर पावसाळ्यात महापालिकेचे दुर्लक्ष

जाधववाडी तलाव ९४.५३% भरले; इंद्रायणी नदीत अनियंत्रित विसर्गाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews