मुख्य अतिथी डॉ. शुभदा नायक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन : “शिक्षक समाजाची भक्कम पायाभूत शक्ती”
पिंपरी, महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त एक भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी, मुंबई येथील प्राचार्या डॉ. शुभदा नायक उपस्थित होत्या.

आपल्या प्रेरक मार्गदर्शनात डॉ. नायक यांनी समाजात शिक्षकांची भूमिका आणि महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षक हा फक्त ज्ञानाचा स्त्रोत नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कार व मूल्यांची पायाभरणी करणारा खरा मार्गदर्शक असतो. आजच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैतिकता विकसित करणे हे शिक्षकांचे प्रमुख कर्तव्य आहे.” तसेच त्यांनी नवी शिक्षण नीती, त्यातील शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाय सुचवले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव केला आणि शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. नीलकंठ डहाळे यांनी केली. त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्देश यावर थोडक्यात माहिती देत प्रमुख अतिथींचे स्वागत केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी व प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी आकर्षक पद्धतीने केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक समितीच्या प्रमुख डॉ. शुभदा लोंढे यांनी मान्यवरांचे मानले.