TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

‘कर्मवीरांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला’ : शशिकांत कराळे

TwinCity News by TwinCity News
September 27, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी – “रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला. पारंपरिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची गरज अधोरेखित करून त्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेचे बीज पेरले, जे आज जगभर अंगीकारले गेले आहे,” असे प्रतिपादन पंढरपूर येथील युवा उद्योजक मा. शशिकांत कराळे यांनी केले.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, साताऱ्याचे माजी चेअरमन मा. साहेबराव पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निर्भय व्यक्तिमत्वाविषयी भाष्य केले. दुर्गम भागातील गरीब रयतेच्या झोपडीत अण्णांनी केलेल्या शिक्षणप्रसाराचा उल्लेख करत, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात शिक्षकांनी स्वतःचे SWOC Analysis करून स्मार्ट होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजोगजी वाघेरे पाटील यांनी “रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील आघाडीची संस्था असून तिच्या तोडीस तोड दुसरी कोणतीच संस्था नाही. येथे शिकलेले विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत राहून समाजाला दिशा देत आहेत,” असे सांगत व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रास्ताविक व स्वागत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सांगवी येथील उद्योजक मा. विजय कामठे व त्यांची पत्नी प्रमिला कामठे, माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या श्रीमती काकडे मॅडम, प्रा. माने सर, नाणेकर सर, यशवंत गायकवाड सर आणि सात देशांचे सायकल भ्रमण करणारे श्री. चोफे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. भाऊसाहेब वाघेरे, श्री. नाणेकर, वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. दत्तात्रय हिंगणे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, IQAC समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. शुभदा लोंढे, प्रा. रुपाली जाधव, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी केले. तर आभार प्रदर्शन नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक अश्रफ पठाण यांनी केले.

कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने निबंध, प्रश्नमंजुषा आणि पोस्टर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.

Tags: Karmvir Bhaurao Patilkarmvir bhaurao patil jayantiMahatma Fule Mahavidyalay Pimpri Chinchwadshashikant karale
ShareSendTweet
Previous Post

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

Next Post

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते देवीची आरती; करिश्मा बारणे यांच्या आयोजनाखाली थेरगावात नवरात्रीचा जल्लोष

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते देवीची आरती; करिश्मा बारणे यांच्या आयोजनाखाली थेरगावात नवरात्रीचा जल्लोष

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews