TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन

TwinCity News by TwinCity News
October 1, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने आणि महापालिकेचे श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी “अभिजात मराठी भाषा दिवस” तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

यानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय साहित्यिक चर्चा, गझल, अभंग, भजन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शने, मराठी चित्रपट कलाकारांशी हितगुज, पोवाडे, बालनाट्य एकांकिका, मराठी वेशभूषा, लोककला कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश मराठी भाषेची अभिजात परंपरा, तिचे समृद्ध साहित्य व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककला, नाट्यप्रयोग, अभिवाचन, गझल गायन, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेची सखोल ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या कार्यक्रमांत सहभागी होता येईल, यादृष्टीने सप्ताहातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.

या उपक्रमात मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, प्रख्यात साहित्यिक, कवी, गायक, व्याख्याते व संशोधक यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे नागरिकांना मराठी भाषेच्या विविध अंगांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच या निमित्ताने मराठी साहित्य व संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत होईल, असा विश्वास महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी व्यक्त केला.

*येथे होणार कार्यक्रम*

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर अशा विविध ठिकाणी होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
………………

*प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणारे कार्यक्रम*

*दिनांक ३ ऑक्टोबर २०२५*

सकाळी ९ वाजता – ग्रंथदिंडी/ शोभायात्रा (मोरया गोसावी मंदिर- गांधी पेठ – चापेकर चौक – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड)

सकाळी ११ वाजता – उदघाटन समारंभ

दुपारी २ वाजता – विद्यार्थी व शिक्षकांसाठी बालनाट्य विषयक प्रशिक्षण कार्यशाळा (मार्गदर्शक – प्रकाश पारखी)

सायंकाळी ६ वाजता – लाभले आम्हाला भाग्य (मराठी नाटक)


*दिनांक ४ ऑक्टोबर २०२५*


सकाळी ९ वाजता – एकांकिका सादरीकरण

दुपारी १२ वाजता – विच्छा माझी पुरी करा (वसंत सबनीस लिखित… राजेश शिंदे दिग्दर्शित…विनोदी मराठी नाटक)

सायंकाळी ५ वाजता – प्राणी आणि गाणी (प्रदीप निफाडकर प्रस्तुत… मराठी गीतांचा कार्यक्रम…)

रात्री ९ वाजता – फोक प्रबोधन ( प्रमोद रणनवरे प्रस्तुत… लोककलेवर आधारित पंरपरेचा वारसा उलगडणारा सांस्कृतिक कार्यक्रम)
              
*दिनांक ५ ऑक्टोबर २०२५*

सकाळी १० वाजता – गजरा नाट्य छटांचा (मराठी नाटकातील संवाद सादरीकरण)

दुपारी १२ वाजता – प्रिय भाई… (पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम)

सायंकाळी ५ वाजता – सुंदर मी होणार (मराठी नाटक)

रात्री ९ वाजता – लेखक अरविंद जगताप लिखित पत्रांचे वाचन (सादरकर्ते- सिने अभिनेते सागर करांडे व सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर)

*दिनांक ६ ऑक्टोबर २०२५*

सकाळी ९ वाजता – स्थानिक कलावंतांच्या गाजलेल्या एकांकिकाचे सादरीकरण

दुपारी १२ वाजता – अलबत्या गलबत्या (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)

सायंकाळी ५ वाजता – सूर्याची पिल्ले (मराठी नाटक)

रात्री ९ वाजता – राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी (मराठी चित्रपट गीतांचा संगीतमय प्रवास)

*दिनांक ७ ऑक्टोबर २०२५*

दुपारी १२ वाजता – लावण्यांचा कार्यक्रम (खास महिलांसाठी)

सायंकाळी ५ वाजता – पत्रा पत्री (सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे प्रस्तुत नाट्याभिनय)

रात्री ९ वाजता – तुझे आहे तुजपाशी (पु.ल.देशपांडे लिखित अजरामर मराठी नाटक)

*दिनांक ८ ऑक्टोबर २०२५*

सकाळी १० वाजता – स्थानिक कलावंतांचा नृत्याविष्कार

रात्री ९ वाजता – मराठी बाणा (मराठी संस्कृतीचा अविष्कार असलेला सांस्कृतिक कार्यक्रम)

*दिनांक ९ ऑक्टोबर २०२५*

दुपारी २ वाजता – संस्कृतीचा लोकरंग – अवघा रंग… संस्कृती रंग (लोकसांस्कृतिक कार्यक्रम)

दुपारी ४ वाजता – अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ

सायंकाळी ५ वाजता – ज्येष्ठ कवी, साहित्यिक रामदास फुटाणे यांचा सत्कार समारंभ

सायंकाळी ७ वाजता – निमंत्रित कवींचे कविसंमेलन (सहभाग – रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, नारायण पुरी, प्रशांत मोरे, निलम माणगावे, आबा पाटील, भरत दौंडकर, गुंजन पाटील, प्रशांत केंदळे, अनिल दिक्षीत)
……………………

*ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी प्राधिकरण येथे होणारे कार्यक्रम*

*दिनांक ६ ऑक्टोबर २०२५*

सायंकाळी ५ वाजता – शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम

*दिनांक ७ ऑक्टोबर २०२५*


दुपारी १२ वाजता – आज्जी बाई जोरात (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)


………………….

*ग.दि.माडगूळकर छोटे सभागृह, आकुर्डी प्राधिकरण येथे होणारे कार्यक्रम*

*दिनांक ७ ऑक्टोबर २०२५*

सकाळी ११.३० वाजता – साहित्यिक चर्चा (विषय- मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास) (सहभाग – मराठी साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी)

दुपारी ३ वाजता – मराठी साहित्यातील प्रतिभावंत कथाकारांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम

सायंकाळी ५ वाजता – कवियित्री इंदिरा संत यांच्या साहित्यावर आधारित अभिवाचन कार्यक्रम

सायंकाळी ६.३० वाजता – कविसंमेलन (सहभाग – स्थानिक कवी)

*दिनांक ८ ऑक्टोबर २०२५*

दुपारी ३ वाजता – प्रसिद्ध कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांचा दृक श्राव्य आविष्कार

दुपारी ४ वाजता – कुमार करंदीकर यांचा गझल, गीत आणि काव्यसंगीताचा कार्यक्रम

सायंकाळी ५.३० वाजता – मराठी वैभव, मराठी गाणी, नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम (सादरकर्ते- केतकी वाडेकर आणि सहकारी)

…………………………

*कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे होणारे कार्यक्रम*

*दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२५*

सकाळी १० वाजता  – भजन स्पर्धा

दिनांक ८ ऑक्टोबर २०२५

सकाळी १० वाजता –  आज्जी बाई जोरात (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)

…………………

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५

सकाळी ९ वाजता – राजा सिंह (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)

सायंकाळी ५ वाजता – महाराष्ट्राची लोकधारा (मराठी संस्कृतीचे भावविश्व साकारणारा सांस्कृतिक कार्यक्रम)

दिनांक ५ ऑक्टोबर २०२५

सायंकाळी ५ वाजता – अभंगवाणी (पं. सुधाकर चव्हाण प्रस्तुत अभंगांचा कार्यक्रम)

दिनांक ८ ऑक्टोबर २०२५

सायंकाळी ५ वाजता – बहुरूपी भारूड (डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि सहकारी पुणे)
……………………….

आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी


दिनांक ७ ऑक्टोबर २०२५


दुपारी १२ वाजता – राजा सिंह (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: # pro. Ramkrushn more prekshgruhAbhijat Marathi Bhasha SaptahKiran GaikwadMarathiMarathi Bhashamarathi bhasha gourav dinPCMCAbhijat Marathi Bhasha saptahShekhar Singh
ShareSendTweet
Previous Post

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते देवीची आरती; करिश्मा बारणे यांच्या आयोजनाखाली थेरगावात नवरात्रीचा जल्लोष

Next Post

आमदार आपल्या दारी — थेरगावात नागरिकांशी थेट संवाद; आमदार शंकर जगताप करतील लोकांच्या प्रश्नांचे निराकरण -करिश्मा बारणे

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

आमदार आपल्या दारी — थेरगावात नागरिकांशी थेट संवाद; आमदार शंकर जगताप करतील लोकांच्या प्रश्नांचे निराकरण -करिश्मा बारणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकला बदली; कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews