थेरगाव, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “आमदार आपल्या दारी” हा जनसंपर्क व सेवा उपक्रम थेरगावात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या, शासकीय कामकाजातील अडचणी आणि महापालिकेशी संबंधित तक्रारींचे थेट निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता थेरगाव येथील सोनाई मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
या उपक्रमात नागरिकांना खालील विषयांवर तक्रारी नोंदविण्याची आणि मार्गदर्शन मिळविण्याची संधी मिळणार आहे –
- शासकीय योजना व दाखले
- रेशनकार्डसंबंधी अडचणी
- वीज, पाणी व ड्रेनेज समस्या
- महापालिका संबंधित तक्रारी
- जनसामान्यांच्या अन्य अडचणी
या उपक्रमाची माहिती देताना सौ. करिश्मा बारणे यांनी सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे तात्काळ निराकरण करणे, हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संवाद, सेवा आणि समर्पण या तत्त्वांवर आम्ही कार्य करीत आहोत.” यावेळी सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, जयदीप माने, रवी भिलारे, दिगंबर गुजर, सनी बारणे यांच्यासह मोठ्याप्रमाणात नागरिक सहभागी होणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : सौ. करिश्माताई सनी बारणे जनसंपर्क कार्यालय, गुजर नगर, थेरगाव मो. ८६००२०१२१२













