पिंपरी चिंचवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवक आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या ‘जनयुवक कार्यालयाचे’ भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ शिवशक्ती गार्डन समोर, जयमल्हार नगर चौक, सांगवी (शॉप नं. ०४, शिवशक्ती सोसायटी) असे असून, उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांची तयारी जोरात सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष विधानसभा), श्रीरंग अप्पा बारणे (खासदार मावळ लोकसभा), शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा), नाना काटे (माजी विरोधीपक्ष नेते पीसीएमसी), माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
डॉ. धम्मरत्न गायकवाड मित्र परिवार यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यामुळे शहरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवीन जनयुक कार्यालय हे तरुण कार्यकर्त्यांसाठी दिशा आणि प्रेरणा देणारे केंद्र ठरणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.













