TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 28, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 28, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

महापालिका सार्वत्रिक निवडणूक; प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाच्या कामाला आजपासून सुरुवात

TwinCity News by TwinCity News
October 18, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजित करण्याचे कामकाज आजपासून (१८ ऑक्टोबर २०२५) सुरू होणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना मतदार यादी विभाजित करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी मतदार यादी विभाजनाबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक प्राधिकृत अधिकारी किरणकुमार मोरे, नगररचना सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंते, निवडणूक कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि प्रगणक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघाची १ जुलै २०२५ ची अंतिम मतदार यादी गृहित धरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यानुसार मतदार याद्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन केले जाणार आहे. यासाठी नेमलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी समन्वयाने काम करावे. हे काम महत्वाचे आणि जबाबदारीचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार विहित वेळेत हे कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा सूचना जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या. कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या कालावधीत रजा दिली जाणार नसून  कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध नियमाधिन कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कामकाजासाठी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी तसेच प्रत्यक्ष स्थळ भेटीसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक व योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.

अविनाश शिंदे यांनी मतदार यादी विभाजित करण्यासंदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रगणकांची भूमिका, बीएलओ आणि पर्यवेक्षकांची जबाबदारी त्यांनी विषद केली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली हे कामकाज काटेकोरपणे पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. प्रभागाच्या सीमारेषेनुसार मतदार यादी विभाजित करण्याची प्रक्रिया विहित वेळेत करावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व ३२ प्रभागांची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करायची आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांच्या याद्या तसेच भोर मतदारसंघातील अंशतः यादीचा यामध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी मतदार यादी विभाजित करणे तसेच माहिती विवरणपत्रात भरणे आदींबाबत सविस्तर माहिती प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. तसेच प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: ElectionElection Commission of IndiaElection Commission of Maharashtramatdar yadi vibhajanPCMC election
ShareSendTweet
Previous Post

रिपाई हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे; भाजप आमच्या सोबत आहे! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Next Post

रहाटणीतील द काकाज इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

रहाटणीतील द काकाज इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews