TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पुररेषेची चिंता सोडा, एका स्क्वेअर फुटालाही धक्का लागणार नाही”- शंकर जगताप

TwinCity News by TwinCity News
November 10, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, चिंचवड मतदार संघातील निळ्या पूररेषेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न राज्यस्तरीय असून त्यावर एकसंध धोरण तयार करण्यात येत आहे.  यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.  समितीचा अहवाल आल्यानंतरच निळ्या पूररेषेसंदर्भात धोरणात्मक निर्णय होणार असल्यामुळे नागरिकांनी नाहक चिंता करण्याची गरज नसल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. दरम्यान चिंचवड परिसरातील  अधिकृत बांधकामांच्या  “एका स्क्वेअर फुटा”लाही धक्का लागणार नाही असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले.

चिंचवड येथे रविवारी (दि. ९) निळी पूररेषा बाधित गृहरचना संस्था, अपार्टमेंट येथील नागरिकांच्या समस्यांबाबत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार शंकर जगताप बोलत होते. यावेळी परिसरातील आजी माजी नगरसेवक, सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले निळी तसेच लाल पूररेषा या संदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे, या अनुषंगाने अनेक मागण्या देखील शासनाकडे मांडल्या आहेत.पूररेषेतील अधिकृत बांधकामांना पुनर्विकासासह अतिरिक्त टीडीआर वापरण्याची परवानगी द्यावी आणि एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये  (यूडीसीपीआर) सुधारणा करून नागरिकांना न्याय द्यावा. तसेच चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवानग्यांवर चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. हि मागणी केलेली आहे. हा प्रश्न फक्त चिंचवडपुरता नव्हे तर संपूर्ण राज्यातील “ब्ल्यू लाईन,रेड लाईन” क्षेत्रांचा आहे. म्हणूनच यासंदर्भात राज्यस्तरावर एकसंध धोरण तयार करण्याची गरज असल्याचे शासनाने मान्य केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात जलसंपदा,
नगरविकास व पर्यावरण विभागातील तज्ञ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे.  ही समिती “ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन’’ क्षेत्रांचा पुन्हा सर्वेक्षण करेल आणि त्यानुसार पूररेषांचे नवे मापन करून वास्तवातील परिस्थितीचा अभ्यास सादर करेल. या  समितीचा अहवाल आल्यानंतर शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, ज्यामुळे आताच्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासास परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होईल. यातून पिंपरी चिंचवड महापालिकेला सुमारे १२०० कोटी रुपयांचा महसूल देखील प्राप्त होणार आहे.

आमदार जगताप पुढे म्हणाले, मंत्रालय पातळीवर प्रत्येक विभागांमध्ये या संदर्भात पत्रव्यवहार सुरू असून, जलसंपदा विभागाकडून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व्हेमध्ये पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीलगत असलेल्या गावांतील पूररेषा नव्याने निश्चित केली जाणार आहे.  वास्तविक जोते पातळी, नदी प्रवाह आणि बांधकाम स्थिरता यांचा तांत्रिक अभ्यास होणार आहे. त्यामुळे जी बांधकामे गेल्या २५ वर्षांपासून अधिकृत रित्या बांधलेली आहेत. त्या बांधकामांबाबत नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. चिंचवड परिसरातील या  अधिकृत बांधकामांच्या  “एका स्क्वेअर फुटा”लाही धक्का लागणार नाही असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले.  नवीन बांधकाम परवानगी सोडून निवडणुकांपूर्वी  नागरी सुविधांबाबत नागरिकांना कोणतीही  अडचण राहणार नाही. मूलभूत सुविधांच्या संदर्भात एकही काम प्रलंबित राहणार नाही असे आश्वासन यावेळी जगताप यांनी दिले.

मेळाव्यातून सोसायटीधारकांना मोठा  दिलासा

मेळाव्यामध्ये आमदार शंकर जगताप यांनी शासन स्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्या संदर्भात माहिती दिली. यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला असल्याची भावना  सोसायटीधारकांनी व्यक्त केली. आमदारांकडून शासन स्तरावर निळ्या पूररेषेबाबत मोठा पाठपुरावा सुरू आहे.  त्यामुळे हा प्रश्न निकालात निघेल असा विश्वास सोसायटी धारकांनी व्यक्त केला.

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

Tags: 9 Novemberblue flood linePimpri ChinchwadPimpri Chinchwad BJPShankar Jagatap
ShareSendTweet
Previous Post

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Related Posts

पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews