TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – शंकर  जगताप

TwinCity News by TwinCity News
December 17, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,:  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा


पिंपरी मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालयामध्ये शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 आणि 17 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या.  तब्बल 730 अर्ज इच्छुक उमेदवाराकडून पक्षाकडे सादर करण्यात आले होते.  या सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप,  आमदार महेश लांडगे,  शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी तब्बल सातशेहून अधिक  उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


या मुलाखत प्रक्रियेबाबत सांगताना निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक ओळख , संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाने नेहमीच पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. याबाबतचे स्पष्ट निकषच पक्षाने ठरवलेले आहेत आणि याच निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर गेल्या दहा वर्षात विकासाच्या वेगाने धावत आहे. औद्योगिक शहर ते मेट्रोसिटी ही शहराची विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी दिल्ली ते गल्ली एक पक्ष काम करत असल्यास वेगाने प्रगती होईल हे गेल्या दहा वर्षात आपण पाहिले आहे. त्यामुळे ”भाजपच्या माध्यमातून शहराची प्रगती” हेच गणित उमेदवार आणि मतदारांनी ठरवले आहे असा विश्वास देखील शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. मुलाखती दरम्यान शहरातील अनेक नामवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि मुलाखतीसाठी उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भाजपच्या बाजूने आहे. यातून उत्साह चैतन्य आणि सकारात्मकतेची लाट जाणवत आहे असे देखील शंकर जगताप यावेळी म्हणाले

………….

या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.  त्यानंतर उमेदवारी वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे संघटन कार्य वेगाने सुरू आहे.  प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे. या मुलाखतीमधून इच्छुक उमेदवारांचे सखोल मूल्यांकन आणि सर्वेक्षण केले जाईल.  त्यानंतरच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देणाऱ्या उमेदवारांबाबत अंतिम  निर्णय घेतला जाणार आहे.

Tags: bjppcmcShankar Jagatap
ShareSendTweet
Previous Post

सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल – शंकर जगताप

Next Post

करिश्मा बारणे यांचा ‘जिंकण्याचा निर्धार’ ठळक; उमेदवारीसाठी दिली मुलाखत

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

करिश्मा बारणे यांचा ‘जिंकण्याचा निर्धार’ ठळक; उमेदवारीसाठी दिली मुलाखत

राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशावर गंडांतर; पक्षांतर्गत बंडखोरीचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews