पिंपळे सौदागर, प्रभाग क्र २८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथून विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह मीनाक्षी अनिल काटे, सायली उमेश काटे, शिताल नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे

रहाटणी – पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधून नाना काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे, सायली काटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना काटे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर शीतल काटे यांनी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावी कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला.















