पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सारिका विशाल मासुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये नव्या आशा, अपेक्षा आणि सकारात्मक जनभावना व्यक्त होत असून, प्रभागात परिवर्तनाची चाहूल लागल्याचे चित्र दिसत आहे.

सारिकाताई मासुळकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वशैलीसोबतच सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभागामुळे त्या सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासार्ह उमेदवार ठरत आहेत. महिलांचे सक्षमीकरण, मूलभूत सुविधा, नागरिकाभिमुख विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर त्यांचा ठाम भर असल्याने जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

या पॅनलला माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्या सक्षम व अनुभवी महिला नेतृत्वाची भक्कम साथ लाभली असून, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या सूक्ष्म नियोजन, संघटन कौशल्य आणि संस्थात्मक विकासाच्या दूरदृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल अधिक मजबूत झाले आहे. यासोबतच सिद्धार्थ बनसोडे यांच्या युवा शक्तीच्या सहभागामुळे पॅनलला नवी ऊर्जा आणि गतिमानता मिळाली आहे.
अनुभव, युवा जोश आणि सामाजिक जाणिवेचा हा अनोखा संगम प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निर्णायक आघाडी मिळवून देईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी पॅनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.













