TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; प्राधिकरणबाधित  नागरिकांना मिळणार ”प्रॉपर्टी कार्ड” आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

TwinCity News by TwinCity News
January 6, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, 6 जानेवारी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड)  महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे.  प्रत्येक प्लॉटवरील  प्रत्येक घराचा सरकारी नकाशा गुगल क्लाऊडवर दिला जाणार आहे,  ज्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नकाशा दिसणार आहे. पाचशे वर्षानंतरही आपले घर आपल्याला गुगलवर दिसेल.  ही सर्व प्रक्रिया  मोफत केली जाणार आहे असे देखील बावनकुळे म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग 17, 23 आणि 24 येथील उमेदवारांसाठी वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप उपस्थित होते. दरम्यान सभेसाठी प्रभाग 17 मधील आशा सूर्यवंशी, नामदेव ढोके, पल्लवी वाल्हेकर, सचिन चिंचवडे तर प्रभाग 23 मधील मनीषा प्रमोद पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे आणि प्रभाग 24 मधील उमेदवार सिद्धेश्वर बारणे, करिष्मा बारणे, गणेश गुजर आणि शालिनी गुजर हे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता.  त्यानंतर मी राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली . या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले.  महापालिका निवडणुका झाल्यानंतर आपण आमदार शंकर जगताप यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून घेणार आहोत. मी स्वतः या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यासाठी शहरात येणार आहे. याशिवाय आपण येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊड वर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यातून  एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज तयार होणार आहे.  ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे.  सरकार विशेष बाब म्हणून  या सर्व घरांचे ड्रोन मॅपिंग करून नागरिकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. त्यामुळे यापुढील काळात  तहसीलदाराकडे चकरा मारावे लागणार नाही.  याचा लाखो परिवाराला दिलासा मिळणार आहे. हे निर्णय होण्यासाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपला आपले मतदान महत्त्वाचे आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी 2017 पासून शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचा आलेख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रगतीच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ”विकासाचे व्हिजन” साध्य करायचे आहे.  त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी मतांच्या रूपाने पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले


बचत गटांना मिळणार लाखाचे अनुदान

नागपूरमध्ये जशी महिला बचत गटांना अनुदान योजना उपलब्ध करून दिली गेली. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले. निवडून आल्यावर शहरातील महिला बचत गटांना प्रत्येकी  1 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाईल.मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजना भाजपचे सरकार असेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: chandrshekhar bavankuleShankar Jagatap
ShareSendTweet
Previous Post

प्रभाग क्रमांक २३ मधील रेखाताई नरेंद्र माने वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार

Next Post

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन 

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन 

प्रभाग 9 - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सम्यक स्वयंसेवा संस्थेचा जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews