पिंपळे सौदागर:दि.१६ जून २०२५ : शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक ५१ येथे विद्यार्थ्यांचे स्वागत मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते फुले व शालेय शिक्षण साहित्य देऊन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित प्राथमिक शाळेतील “मुलांचे पहिले पाऊल” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात नाना काटे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यासाठी प्रथम दिवसाचे आकर्षण असणारी शालेय पाठयपुस्तकांचे व शालेय वस्तूंचे किट आणि गणवेश वाटप देखील करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमन,मुख्याध्यापिका शसुरेखा गेंगजे ,पर्यवेक्षिका खंडागळे मॅडम ,आकांशा फौंडेशन चे सदस्य ,उद्योजक सोमनाथ खेडेकर व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.