नेहरूनगर, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय हालचालींना वेग दिला आहे. प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर तसेच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे हे उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असून, प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विकासकामांचा ठसा, जनतेशी थेट संवाद आणि संघटनात्मक ताकदीच्या बळावर राहुल भोसले पुन्हा आपल्या पॅनल सह विजयी होतील अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
अनुभवी नेतृत्व, प्रशासकीय जाण आणि तरुण चेहऱ्यांचा समन्वय साधत राष्ट्रवादी काँग्रेस प्रभागातील स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत निवडणूक रिंगणात उतरली आहे. या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेमुळे प्रभाग क्र. 9 मधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.













