TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, May 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, May 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

TwinCity News by TwinCity News
April 9, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी

भोसरी, दि.९ एप्रिल २०२६:- राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ या कार्यालयाचे उद्घाटन (दि.९) महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

RELATED POSTS

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन


यावेळी डॉ संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे,प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी उपस्थित होते.

या केंद्राच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की,ज्या मुलांकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मागे पडतात, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १००% मोफत सेवा मिळणार आहे.बाहेरून येणाऱ्या अनेक होतकरू मुलांना राहण्याची जागा शोधण्यापासून ते जॉब मिळवण्यापर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एजंटकडून त्यांची फसवणूक केली जाते. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्रे पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू केली आहेत. येथे नोंदणी, नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत मिळतील. ‘विनामूल्य नोकरी’ हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून तरुणांनी एका रुपयाचाही खर्च न करता या संधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या आतापर्यंत जवळपास दोन हजार युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहे.

दहावी, बारावी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक फुगे प्रायमा,A विंग मधील तिसरा मजला ऑफिस नंबर १२ आणि चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर अशा दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त युवकांनी येथे नाव नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवावी.विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags: mayor ravi landagerojgar melava
ShareSendTweet
Previous Post

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

Next Post

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

Related Posts

पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
Next Post

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (175)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews