TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 5, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 5, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

TwinCity News by TwinCity News
September 4, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केली असली, तरी त्यानुसार अद्याप प्रभागनिहाय अधिकारी, सफाई कामगार, फवारणी कामगार तसेच आवश्यक साधने व उपकरणांचे योग्य नियोजन आणि वाटप झालेले नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नवीन प्रभागांची निर्मिती केवळ कागदावर न राहता त्या प्रभागांना सक्षम मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचरा आणि स्वच्छता व्यवस्थेच्या प्रश्नावर भूमिका मांडताना राहुल कलाटे यांनी प्रशासनासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वरूप वेगवेगळे असून त्यानुसार त्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि विल्हेवाट यांचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या प्रश्नाकडे केवळ एखाद्या परिसराचा प्रश्न म्हणून न पाहता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा प्रश्न म्हणून एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे कलाटे यांनी स्पष्ट केले.

मोशी की पुनावळे कचरा प्रश्नावर राजकारण नको
मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेनंतर कचरा डेपोच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकारणावरही राहुल कलाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “कचऱ्याच्या प्रश्नावर नागरिकांची दिशाभूल करणारे राजकारण करण्यापेक्षा त्या त्या वेळची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.”

मोशी येथील कचरा डेपोचे नियोजन ज्या काळात (१९९१ साली) करण्यात आले, त्या वेळी हा परिसर शहराच्या मुख्य नागरी वस्तीजवळ नसलेला आणि तुलनेने विरळ लोकवस्तीचा भाग होता. मात्र, ताथवडे-पुनावळे परिसरात कचऱ्याच्या आरक्षणाचा विचार होत असताना आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज हा परिसर मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आणि घनदाट नागरी वस्तीचा भाग आहे. त्यामुळे पूर्वीचे निर्णय आणि आजची परिस्थिती यांची तुलना करताना वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

“कचऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि भविष्यातील शहर नियोजनाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. आजची परिस्थिती काय आहे, भविष्यात शहराचा विस्तार कसा होणार आहे आणि नागरिकांच्या हितासाठी कोणता पर्याय योग्य आहे, याचा सर्वंकष विचार झाला पाहिजे,” असे राहुल कलाटे यांनी सांगितले.

कचऱ्याचा प्रश्न हा मोशीचा, पुनावळेचा किंवा कोणत्याही एका भागाचा प्रश्न नाही; तो संपूर्ण पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षीय किंवा स्थानिक राजकारण बाजूला ठेवून शहर म्हणून त्यावर कायमस्वरूपी आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही कलाटे यांनी स्पष्ट केले.

नवीन प्रभागांना सक्षम यंत्रणा, योग्य मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री देऊन स्वच्छता व्यवस्थेचे तातडीने नियोजन करावे आणि कचरा व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहराचा एकात्मिक आराखडा तयार करावा, अशी मागणी राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

RELATED POSTS

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

Tags: #pcmc pimprichinchwad पंचमककचराडेपोpimprichinchwadmunicipalcorporationrahul kalate
ShareSendTweet
Previous Post

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

Next Post

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

Related Posts

पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
Next Post
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews