TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, May 30, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, May 30, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

१२ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर पिंपरीत; ‘एक संधी वंचितला’ सभेत करणार मार्गदर्शन– शहराध्यक्ष नितीन गवळी

TwinCity News by TwinCity News
December 11, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित ‘एक संधी वंचितला’ ही भव्य निर्धार सभा शहरात रंगणार आहे. यशवंत आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारी ही सभा राजकीय वातावरण तापवणारी ठरणार असून या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सभा शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या (भीमसृष्टी)मागील मैदानात होणार आहे.या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीचे बिगुल फुंकल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी दिले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, शहर कार्याध्यक्ष राजेंद्र साळवे, शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड,महिला शहराध्यक्षा शारदा बनसोडे, युवक शहराध्यक्ष विनोद गायकवाड, महासचिव जितेंद्र मोटे, सचिन ओव्हाळ, सुजाता निकाळजे, मंदाकिनी गायकवाड, सुनील जावळे इत्यादी उपस्थीत होते.

या सभेत नेत्या अंजलीताई आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ अनिल अण्णा जाधव, ऍड सर्वजीत बनसोडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष  नितीन गवळी भूषवणार आहेत.वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना नितीन गवळी म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीस काहीच महिने बाकी असताना शहरातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ‘एक संधी वंचितला’ ही शक्तिप्रदर्शन सभा आयोजित केली असून, या सभेतून पक्ष शहरातील निवडणूक रणनीतीचा पहिला इशारा देणार आहे. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सभेचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक अॅड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांना दिशा देणार आहेत.त्यांच्या भाषणातून आगामी निवडणुकीवर मोठी घोषणा अपेक्षित आहे.शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पाणी समस्या, अनियंत्रित विकास, कामगारांचे प्रलंबित प्रश्न, तसेच विस्थापितांच्या मागण्या या सर्व मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीची ठोस भूमिका सभेतून जाहीर होईल.शहरातील वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, किसान आघाडी, महिला आघाडी आणि सर्व घटक संघटनांची तयारी पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार आहे. ‘एक संधी वंचितला’ या सभेतून पक्ष आपली दिशा, ध्येय आणि ठोस भूमिका जनते समोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, कामगारांचे प्रश्न, तसेच विकासकामांमधील असमतोल यावर पक्ष परखड भूमिका घेणार असून प्रकाश आंबेडकरांचे भाषण नागरिकांना नव्या राजकीय पर्यायाची हमी देईल, असा विश्वास वंचित चे राज्यउपाध्यक्ष अनिल जाधव यांनी व्यक्त केला.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: Ek sandhi vanchitlaNitin Jadhavprakash ambedkarSarvjit Bansodevanchit bahujan aghadiVBA
ShareSendTweet
Previous Post

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे- प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे- प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या "365 दिवस कर्तव्यपथाचे" या  वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews