TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home शिक्षण

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

TwinCity News by TwinCity News
December 5, 2025
in शिक्षण
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची  १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कुल बस नियमावली व नविन अटी शर्तीचे पालन होत असल्याबाबत तपासणी करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले आहे.

सर्व शाळांमध्ये शासन निर्णय क्रमांक संकिर्ण ११२५/प्र.क्र. २४१/२५/ एसएम-१, दि. १६ एप्रिल २०२५ नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भैतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे. सर्व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समित्यांनी  शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्राची तपसणी करावी. ज्या वाहन चालकांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल अशा वाहन चालकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालविण्यास दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 

शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरणः क्रमांक १० मध्ये समितीने दिलेल्या निष्कर्ष व शिफारशीमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याबाबत शाळेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत.  वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे.

परिवहन विभाग व पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे होईल याची विशेष खबरदारी घ्यावी. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED POSTS

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय इंदलकर यांची बिनविरोध निवड

Tags: Educationschoolschool vanstudent
ShareSendTweet
Previous Post

हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट,  लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

Next Post

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणारे विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार अमित गोरखे

Related Posts

शिक्षण

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

September 26, 2025
शिक्षण

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

August 1, 2025
शिक्षण

पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय इंदलकर यांची बिनविरोध निवड

July 12, 2025
शिक्षण

‘आप’चा महापालिकेच्या इंग्रजी शाळांवर आक्षेप; खासगीकरण करत असल्याचा आरोप

July 11, 2025
इतर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

June 23, 2025
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2025
Next Post

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणारे विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार - आमदार अमित गोरखे

वासुदेवांच्या माध्यमातून मतदार जनजागृती : सांगवीत डॉ.प्रज्ञाताई गायकवाड यांचा अनोखा प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews