TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, June 1, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, June 1, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home शिक्षण

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

TwinCity News by TwinCity News
March 1, 2026
in शिक्षण
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तळेगाव येथील बीएड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

तळेगाव, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट बीएड कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शब्दवेध: भाषा आणि विचार’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सचिव किशोर राजस, खजिनदार सुनील कडोलकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले.

‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ हा विशेषांक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक, सहायक प्राध्यापक शीतल महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. मराठी भाषेची उत्पत्ती, तिचा आजवरचा प्रवास, एआय मध्ये मराठीचे स्थान, राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेचा सहभाग आणि दिलेले महत्व तसेच इतर विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे लेखन केले. मराठी भाषेची विविधांगाने मांडणी या विशेषांकात केली आहे.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांना अधिक महत्व दिले गेले आहे. यापुढे सर्व शाखांमधील शिक्षण मातृभाषेतून देण्यात येणार आहे. अनेक अभ्यासक्रमांतील संदर्भग्रंथ मराठीमध्ये आणण्यासाठी शासन आणि इतर अनेक संस्था काम करत आहेत. भाषेचा अडथळा आल्याने अनेकांना आवड असलेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यामुळे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात हा अडसर दूर केला आहे.

मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. इतर भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत. त्यामुळे मराठी भाषा नवीन टप्प्यावर आली आहे. भाषा अतिशय समजून घेण्याची गोष्ट आहे. भाषेची ताकद समजून घेत संस्कृती टिकवली पाहिजे. इतर भाषा शिकल्या पाहिजेत. परंतु मातृभाषेला कमी लेखून इतर भाषांना अधिक महत्व देता कामा नये, असे सांगत मलघे यांनी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या विविध कवितांसह त्यांची स्वरचित चिंधी कविता सादर केली.

प्रास्ताविक प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक यांनी केले. कुसुमाग्रजांनी मातृभाषेला सन्मान मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शब्दवेध : भाषा आणि विचार या विशेषांकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. भाषेबद्दलच्या जबाबदारीचे भान आपण जपले पाहिजे. या विशेषांकांच्या निमित्ताने ही जबाबदारी आता अधिक पटीने वाढली आहे. संपादकीय मनोगत सहायक प्रा. शीतल महाले यांनी व्यक्त केले.

RELATED POSTS

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

Tags: shabdhvedsnehvardhak mandalTalegav Dabhade
ShareSendTweet
Previous Post

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

Next Post

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

Related Posts

शिक्षण

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
शिक्षण

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

December 5, 2025
शिक्षण

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

September 26, 2025
शिक्षण

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

August 1, 2025
शिक्षण

पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय इंदलकर यांची बिनविरोध निवड

July 12, 2025
Next Post

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews